जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने नंदूरबार येथे होणाऱ्या आदिवासी अकादमीसाठी प्रतिवर्षी पाच कोटी रुपये याप्रमाणे 25 कोटी रुपयांचा निधी, विद्यापीठात 200 क्षमतांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहाला मंजूरी तसेच आर.ए.एन. अंतर्गत नर्सिंग कोर्स सुरु करण्यास मान्यता, आणि विद्यापीठातील बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्रासाठी आवश्यक तो निधी आणि पदांना मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठ नामविस्तार सोहळयात केली. याशिवाय विद्यापीठासाठी गिरणा नदीवरुन पुराचे पाणी आरक्षित करुन विद्यापीठाच्या पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी बंधारा देण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. एकनाथराव खडसे, कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील, प्र-कुलगुरु प्रा. पी. पी. माहुलीकर, महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांची उपस्थिती होती.
प्रारंभी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी भूमिकाकथन करताना नामविस्ताराबद्दल राज्य शासनाचे आभार मानले. तसेच विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा सादर करुन राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या. यावेळी बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्तमविद्याच्या नामविस्तार सोहळा विशेषांकाचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला संगीत विभागाने विद्यापीठ गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशुतोष पाटील, डॉ. राजश्री नेमाडे, प्रा. आर.बी. संदानशीव यांनी केले. कुलसचिव भ.भा. पाटील यांनी आभार मानले.
यावेळी मंचावर खा. रक्षा खडसे, खा. ए.टी. पाटील, आ. सतीश पाटील, आ. हरीभाऊ जावळे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. स्मिता वाघ, आ. चंदु पटेल, आ. सजय सावकारे, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. उन्मेष पाटील, उपमहापौर अश्विन सोनवणे, माजी आमदार गुलाबराव देवकर, गुरुमुख जगवाणी, रविंद्रभौय्या पाटील, जौन उद्योग समुहाचे अशोक जौन, प्रधानसचिव प्रवीणसिंह परदेशी, महसुल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील, डॉ. केशव तुपे, डी.पी. नाथे, दीपक पाटील, विवेक लोहार, प्रा. नितीन बारी, प्रा. प्रिती अग्रवाल, प्राचार्य एल.पी. देशमुख, प्राचार्य डी.एस.सुर्यवंशी, प्रा. मोहन पावरा, प्रा. एस.टी. इंगळे, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. जे.बी. नाईक, प्रा. ए.बी. चौधरी हे उपस्थित होते.