आदिवासी कोळी महासंघा विभागीय कार्यकर्ता मेळावा भडगाव येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न. 

यावल ( प्रतिनिधी )आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमाती चे जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र कोळी नोंदीवरून सरसकट द्यावें अन्यथा राज्यभर मोठा लढा उभारणार असा ईशारा आदिवासी नेते डॉ दशरथ भांडे व कोळी समाज बांधवांच्या वतीने देण्याा आला व न्यायमुर्ती हरिदास समितीच्या सदस्याचा यावेळी जाहीर निषेध आदीवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला .दिनांक २०ऑगस्ट २०२३ रविवार रोजी आद्यकवी रामायणकार महर्षि वाल्मीकी यांची तपोभूमि चाळीसगाव येथे घेण्यात आला.

न्यु भुषण मंगल कार्यालय भडगाव रोड चाळीसगाव येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यातआदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे प्रमुख मार्गदर्शक होते आद्यकवी महर्षि वाल्मीकी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मेळावाचे उद्घाटन केले. मेळाव्यात प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे अध्यक्षस्थानी होते तर रघुनाथराव इंगळे,न्यायालयीन कोर कमेटी अध्यक्ष मनोहरराव बुध ,विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रशांत भाऊ तराळे राज्य संघटक प्रल्हाद सोनवणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश घाटे,बैंकचे सेवा निवृत्त व्यवस्थापक गणेशराव बोपटे अमरावती कर्मचारी अध्यक्ष संजय कांडेलकर जळगाव जिल्हाध्यक्ष

नामदेव कोळी युवक जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष संभाजी शेवरे ग्रामीण उपाध्यक्ष अनिल भाऊ सावळे ॲड अजय जाधव उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अण्णासाहेब फुणगे प्रसिद्धि प्रमुख संजय मेढे चाळीसगाव तालूका अध्यक्ष संजयकुमार सोनवणे मोरे सर तुकाराम मोरे सर इ मान्यवर प्रमुख पाहूणे होते जेष्ठ नेते माजी सभापती बाबुराव मोरे तात्या प्रमुख अतिथि म्हणुन उपास्थित होते .

या मेळाव्याचे आयोजन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे चाळीसगाव तालूका अध्यक्ष संजय कुमार सोनवणे उपाध्यक्ष दशरथ शेवरे शहर अध्यक्ष सदाशिव झोडगे शहर उपाध्यक्ष राहुल कोळी यांनी केले सुत्रसंचालन प्रल्हाद सोनवणे प्रास्ताविक किर्तनकार निवृत्ती चित्ते यांनी तर आभार दशरथ शेवरे यांनी केले उत्तर महाराष्ट्र संघटन सचिव जितेन्द्र कोळी

जळगाव जिल्हा महानगर अध्यक्षा शोभाताई कोळी, महिला संपर्क प्रमुख रजनी सोनवणे, जळगाव जिल्हा

सचिव दिपक कोळी, ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख संजय मेढे, पाचोरा तालूका अध्यक्ष दशरथ जाधव , भडगाव तालूका अध्यक्ष कैलास जाधव मार्गदर्शक रविन्द्र जाधव चाळीसगाव तालूका महिला अध्यक्षा ज्योती शेवरे सचिव प्रमिला कोळी, साहेबराव सुर्यवंशी, सुभाष सुर्यवंशी लक्ष्मणकांत सुर्यवंशी राजु गुडेकर दिलीप सोनवणे विजय बागुल नेहरू शेवरे भागवत कोळी अभिमन शेवरे माधवराव कोळी संतोष कोळी उमेश ठोंबरे अण्णा कोळी,दिलीप सोनवणे, विजय मोरे,नाना मोरे धनराज काकडे, किरण कोळी, बाबुलाल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात आदिवासी कोळी महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकारींना डॉ दशरथ भांडे व इतर मान्यवरांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन सत्कार केला या मेळावात डॉ.दशरथ भांडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि अन्यायग्रस्त अनुसूचित जमाती ला जात प्रमाण पत्र व वैधता प्रमाण पत्र देण्यात येत असलेल्या अडचणी सोडविण्याच्या दुष्टीने व जात प्रमाण पत्र वैधता प्रमाण पत्र याबाबत सुलभता यावी व अन्याय दूर व्हावा या हेतूने माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी न्यायमुर्ति हरिदास यांच्या अध्यक्षते खाली एका कमिटी चे गटन केले समाजाला संपूर्ण न्याय मिळावा म्हणून त्यामध्ये आदिवासी कोळी समाज तज्ञांची नियुक्ती केली ॲड, चेतन पाटील व अविनाश कोळी से समाजाचे प्रतिनिधि समिती मध्ये होते परंतु हरिदास समिती ने दिलेला प्रस्तुत अहवाल मात्र आपल्या हिताचा नसुन संपूर्ण अहवाल हा आपल्या विरोधात आहे याअहवालाची अंमलबजाणी करण्यात येऊ नये या समितीने आपल्याला नेमून दिलेल्याकार्य कक्षे बाहेर काम केल्या मुळे आदिवासी कोळी जमातीचे अस्तित्व नष्ट करणारे आहे या अहवालामुळे राज्यात एक कोटी तीस लाख अनुसूचित जमातींची संख्या असून त्यापैकी एक कोटी अनुसूचित जमातींवर घटना दत्त आरक्षणाबाबत अन्याय होत आहे त्यापैकी टोकरे कोळी कोळी महादेव मल्हार कोळी ढोर कोळी व इतरही प्रमुख जमातीला अनुसूचित जमाती चे जात प्रमाण पत्र नाकारणे सर्रास सुरू आहे शासकीय योजना मध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नाही संपूर्ण समाज बे चिराग होत आहे शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातींचे जात प्रमाण पत्र व वैधता प्रमाण पत्र सरसकट तात्काळ देण्याचे कार्यवाही करावी शासनास आपल्या हिताचा अहवाल सादर न केल्या बदलॲड चेतन पाटील व अविनाश कोळी यांचा या मेळाव्यात जाहिर निषेध करण्यात आला या मेळाव्यात प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि प्रत्येक तालूका ठिकाणी कोळी समाज सभागृह व आपल्या समाजातील मुला मुलींसाठी आदिवासी शाळा व वसतीग्रह उभारणे गरजेचे आहे त्याकरीता आमदार खासदारांच्या मार्फत शासनाकडे पाठपुरावा करावा त्यासाठी आदिवासी कोळी महासंघा च्या माध्यमातून मी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे राज्य संघटक प्रशांत तराळे यांनी यावेळी टोकरे कोळी कोळी महादेव व इतर वंचित आदिवासी समाजाच्या समास्या जात प्रमाणपत्र वैधता प्रमाण पत्रा मिळविण्या साठी येत असलेल्या अडचणीआदिवासी कोळी समाजातील अधिसंख्य झालेले अधिकारी व कर्मचारी वरील अन्याय व इतरअडचणी दूर करण्यासाठी आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती सतत कार्य करीत आहे असे सांगितले यावेळी जेष्ठ नेते माजी सभापती बाबुराव मोरे तात्या ,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अण्णासाहेब फुणगे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी शेवरे ॲड अजय कोळी तुकाराम मोरे सर यांनीही मनोगत व्यक्त केले या आदिवासी कोळी महासंघ जळगाव जिल्हा चाळीसगाव कार्यकर्ता मेळाव्यात समाजातील

जेष्ठ श्रेष्ठ नेते महिला युवक कर्मचारी बांधव पदाधिकारी, कार्यकर्ते सदस्य व समाज बंधु-भगिणी मोठया संख्येने उपस्थित होते .