आदिवासी कोळी समाजाचा 26 रोजी जळगावी मोर्चा

0

भुसावळ- टोकरे, महादेव व मल्हार कोळी बांधवांचा बुधवार, 26 रोजी जळगाव येथे मोर्चा काढण्यता येणार आहे. या संदर्भातील प्रमुख मागण्यांसह व अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी समाजबांधवांची बैठक जिल्हा परीषदेचे गटनेते प्रभाकर नारायण सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली यावलच्या शेतकी संघात होत आहे. बैठकीत अ‍ॅड.गणेश सोनवणे मार्गदर्शन करतील. जिल्हाभरातील कोळी समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भरत कोळी, संजय नन्नवरे, गंगाराम तायडे, नामदेव सपकाळे, किरण कोळी, अनिल कोळी, गोकुळ तायडे, गणेश कोळी, अमर कोळी, समाधान सोनवणे आदींनी केले आहे.