साक्री । आदिवासी कोकणी समाज संघटना साक्री तालुका अंतर्गत बोदगाव,चिंचपाडा,जमझिरा व उंबरखंडवा गावांना गावसमिती स्थापन करण्यात आली व फलक अनावरणाचा कार्यक्रम झाला,यावेळी आदिवासींचा इतिहास 7000 वर्षे पूर्वीचा आहे.विवाह सोहळ्यासाठी जास्त खर्च करु नये,दारू बंद करा, शिक्षणासाठी खर्च करावा, संघटनेने मन परिवर्तन करा.तसेच धुळे ,नंदुरबार,नाशिक,ठाणे, व डांग सर्व समाज एकत्र संघटीत राहा.पारंपारिक पेहराव वापरावा, सत्कारामध्ये पुस्तक द्या, वधू-वर मेळावे व कोकणी समाजातील मुले आणि मुलींची नोंदणी करावे, छोट्या मुलांना लेखन साहित्य द्यावे, आपला परिचय करून द्यावा. कुठल्याही प्रकारची अडचणी संघटनेकडे सांगितली पाहिजे. संघटनेचे संपर्क कार्यालय सुरू करा. आदिवासी गावांमध्ये समिती स्थापन करा, संघटनेला राजकीय नेतेची मदत होईल, आथिर्क मदतीसाठी 1 ते 5 रु.मिळेल तेवढी द्यावी, संघटनेचा फायदा आता मात्र होणार नाही परंतु काही वर्षनी नक्की फायदा होणार.शिक्षणाकडे जास्त लक्ष केंद्रित करा असे मनोगत माजी खासदार बापूसाहेब चौरे यांनी केले.
सामाजिक बांधिलकी पाळावी
यावेळी टीकाराम बहिरम, मोहनरावसाहेब सुर्यवनसी,विजय गायकवाड, शांताराम गांगुर्डे,कांतीलाल भोये,धीरज अहिरे,भतीबाई भोये सरपंच गोविंद बहिराम,सुहास सुर्यवंशी, गणपत बहिराम, लक्ष्मन सुर्यवंशी, पंडित बागुल, बारकू ठाकरे, देविदास गावीत, दिनेश गायकवाड, रमेश भोये, हिरामण गायकवाड,राजू चौरे, गोरख भोये, हरीचंद्र बहिराम, पंडित बागुल, बकाराम कामडे,लक्षमन गावीत,शिवाजी गायकवाड, नारायण बहिराम, सखाराम पाडवी,रमेश सुर्यवंशी,सचिन राऊत, अजय चौरे व मित्र परिवार, व तालुका अध्यक्ष डॉ.रंजन गावित, तुकाराम बहिरम, मांगीलाल गांगुर्डे, हेमंत अहिरे, गणेश गावित, संदीप चौरे बालाजी गवळी, तानाजी बहिराम, येशवंत भोये, प्रतिभा देशमुख, पुष्पाताई चौधरी, रावजी मापलगाव, कलाकार साबळे, व ग्रामपंचायत सदस्य सचिव, वसंत गांगुर्डे, युवराज चौरे,आदी उपस्थित होते.