आदिवासी जमातीला आरक्षण व नोकरीत संरक्षण देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

0

कोळी समाजाच्या शिष्टमंडळाने घेतले मुंबई भेट

मुक्ताईनगर– आदिवासी कोळी व तत्सम जमातींना आरक्षण आणि त्याद्वारे देण्यात आलेले नोकरीतील संरक्षण कायम करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिली. त्यांनी नुकतीच शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. कोळी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असतानाच नोकरीत असलेल्या कर्मचार्‍यांवर जात पडताळणी दाखल्यावरून गंडांतर येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मध्य प्रदेश शासनाने माझी या अनुसूचित जमातीच्या मल्हा, धिवर केवट इत्यादी पोटजातींनी अनुसूचित जाती प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती मिळाली असल्यास त्यांना नोकरीत संरक्षण देण्याचा निर्णय 12 जानेवारीला घेण्यात आला आहे याकडे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. कोळी समाजावर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय होत असून शासनाने आदिवासी कोळी जमातीला अनुसूचित जमातीचे सरसकट आरक्षण देण्याची मागणी देखील रमेश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.