फैजपूर प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन ः नंदुरबारच्या सहआयुक्तांच्या आडमुठेपणाविषयी तक्रार
फैजपूर- आदिवासी तडवी भिल्ल अनुसूचित जमातीच्या जातपडताळणी वैधता प्रमाणपत्रास हेतु पुरस्कर होणार्या विलंबाबाबत आदिवासी तडवी भिल्ल संघर्ष समितीच्या समाजस्तरीय शिष्टमंडळाने आज फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयाला निवेदन दिले आहे. निवेदनाचा आशय असा की, नंदुरबार विभागाच्या सह आयुक्त तथा अध्यक्ष अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीच्या बबिता गिरी यांनी गेल्या एक वर्षांपासून रुजू झाल्यानंतर जळगांव जिल्ह्यातील सातपुडा रांगातील वनांमध्ये राहणार्या आदिवासी तडवी भिल्ल अनुसूचित जमातीचे एकही वैधता प्रमाणपत्र निगर्मित केलेले नाही त्यामुळे त्याचा दुष्परीणाम आमच्या गरीब दुबळ्या आदिवासी तडवी भिल्ल अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्रास भोगावा लागला आहे.
जात प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त
आजही विद्यार्थी त्रास भोगत आहे त्यांना उच्च शिक्षण, वसतिगृह प्रवेश, शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत आहे. काही विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे व बबिता गिरी यांच्या आडमुठे धोरणाद्वारे खरे आदिवासी लाभापासून वंचीत राहिले आहे. विद्यार्थ्यांबरोबर नोकरी , रोजगारनिमित्त व राजकीय क्षेत्रातील खर्या आदिवासी भिल्लांना हक्काच्या लाभरापासून वंचीत रहावे लागले असून कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. दरम्यान, जातपडताळणी दक्षता समिती नंदुरबार यांनी आदिवासी तडवी भिल्ल अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्राच्या अहवालामध्ये जळगांव जिल्ह्यातील खरे तडवी भिल्ल समाजास वेठीस ठेवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जातवैधता प्रमाणपत्रावर सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी समितीने पात्र अपात्रतेचा निर्णय देणे बंधनकारक आहे परंतु प्रस्तुत मुद्यानुसार बबिता गिरी या रूजू झाल्यापासून एक वर्षांमध्ये एकही आदिवासी तडवी भिल्ल अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्र निगर्मीत न केल्याने जळगांव जिल्ह्यातील खर्या आदिवासी तडवी भिल्ल समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्
यांची होती उपस्थिती
प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार पी.सी.धनगर यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना ज्येष्ठ समाजसेवक हमीद भायखा तडवी, राजू बिर्हाम, रमजान रसुल तडवी, अहमद जबरा तडवी, मासूम रहेमान तडवी, रशीद सुभान तडवी, मीना तडवी, आलिशान कादर तडवी, सायबू इब्राहिम तडवी, रशीद रसूल तडवी, नसीम हमीद, संजू जमादार, नगरसेवक रशीद तडवी, मुबारक फत्तू तडवी, उस्मान रमजान तडवी, रशीद बाबू तडवी यांची उपस्थिती होती.