जळगाव । आदिवासी दिनानिमित्त आदिवासी एकता परिषदेकडून बुधवारी 9 रोजी शिवतिर्थ मैदानापासून रॅली काढण्यात आली. आदिवासी वसतीगृहातील शेकडो युवक-युवतींनी सहभाग घेतला. पारंपरिक ढोल व संगीताच्या गजरात आदिवासी विद्यार्थ्यांनी बहारदार नृृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या हातात विविध घोषणा असलेले बॅनर घेतले होते. वनांवर हक्क केवळ आदिवासींचा अशा घोषणा देखील विद्यार्थ्यांनी रॅली दरम्यान दिल्या.
‘आमो आखा एक से’, ‘जय जंगल, जय आदिवासी’, अशा विविध घोषणा देत व पारंपरिक पोषाखात नृत्य सादर करुन रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शेकडो आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपला सहभाग घेतला. रॅलीत मध्ये विद्यार्थ्यांनी एकलव्य, तंट्या भिल व ख्वाजा नाईक यांच्या पेहराव केला होता. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसोबत मुलींचाही मोठा सहभाग होता. शिवतिर्थ मैदानापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीनंतर शानभाग सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मू.जे.महाविद्यालयाचे प्रा.के.के.वळवी, व्ही.जे.वळवी आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.के.के.वळवी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसमोेर असलेले आव्हाने व त्या आव्हानांसमोर मात करण्याचा उपाय या विषयावर मार्गदर्शन केले.