सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील
दीपनगर – जीडीपी वाढत असून जीएसटीमुळे उत्पन्न वाढत आहे. आदिवासी पाड्यांवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच सौरऊर्जेद्वारे वीज पोहचली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, विजेच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होत असून महाराष्ट्रातून अन्य राज्याला आपण वीज देवू, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.