कल्याण : शहापूर मधील आदिवासी पाड्यावर मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या असून कुपोषणासह इतर आजाराचा सामना या पाड्यावरील लहान मुलांना करावा लागत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे या परिसराच्या विकासासाठी येणारा केंद्र आणि राज्य सरकारचा निधी जातो कुठे असा प्रश्न समाज सुधारक फाऊडेशनच्या अध्यक्षा डॉ रुपिंदर कौर यांनी उप्स्थीत केला असून याबाबत त्यांनी राज्य शासनाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. समाज सुधारक फाऊडेशनच्या वतीने डॉ कौर यांनी नुकताच शहापूर, पालघर मधील आदिवासी पाड्याचा दौरा केला. यावेळी या भागात मोठ्या प्रमाणत आरोग्याच्या समस्या असून उपचारासाठी आरोग्य केंद्रा पर्यत पोचण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नसल्याचे आढळून आले.
पिण्याच्या पाईप लाईन दिखाव्यासाठी
गरिबीमुळे मुलावर उपचार होत नसून या नागरिकांना पिण्यासाठी देखील पाणी नाही. पिण्याच्या पाईप लाईन दिखाव्यासाठी टाकण्यात आल्या असल्या तरी या पाईप लीन मधून मागील 2 वर्षात एक थेंब देखील पाणी आले नसल्याच्या नागरिकाच्या तक्रारी असल्याचे सांगत शासन या भागातील नागरिकाच्या विकासासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत असतानाही हा निधी या नागरीका पर्यत पोचतच नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पाड्याची अवस्था तशीच
शहरात वाहतुकीच्या पुरेशा सुविधा असतानाही रुग्णवाहिकासाठी आमदार खासदार आणि एन जिओकडून पुढाकार घेतला जातो मात्र 40 ते 45 किमी पर्यत आरोग्याच्या सुविधा नसलेल्या या भागासाठी रुग्णवाहिका देण्याचे सौजन्य देखील लोकप्रतिनिधी दाखवत नसून या नागरिकांच्या तक्रारी मांडण्यासाठी लोकप्रतिनिधीची भेट घेण्याचा प्रयत्न केल्यास लोकप्रतिनिधी आपल्याला वेळ देखील देत नसल्याची तक्रार डॉ कौर यांनी केली आहे. या नागरिकाच्या समस्या सोडविण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे वर्षभरा पूर्वी निवेदन दिले होते मात्र आजही या पाड्याची अवस्था तशीच असल्याचे डॉ कौर यांनी सांगितले.