चेतना परीषदेच्या उपोषणाची सांगता ; आमदार हरीभाऊ जावळेंची शिष्टाई यशस्वी
फैजपूर- फैजपूर उपविभागातील आदिवासी बांधवांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देतांना कार्यालयाकडून बेकायदेशीररीत्या चुकीच्या नमुन्यात जात प्रमाणपत्र देण्यात आले व हे प्रमाणपत्र बदलून मिळण्याच्या मागणीसाठी आदिवासी चेतना परीषदेकडून प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले होते. आमदार हरीभाऊ जावळे यांनी आदिवासींच्या समस्या जाणून घेत आदिवासी विकास विभागाचे उपसचिव ल.गो.ढोके यांच्या स्वाक्षरीच्या जीआर विषयी दूरध्वनीवरून संपर्क साधला. प्रांताधिकार्यांनी नवीन प्रकरण सादर करण्याचे संबंधिताना सांगितले असलेतरी आता नवीन प्रकरण न सादर करता केवळ सेतुमार्फत जात प्रमाणपत्राची प्रत तयार करून पाठवायची असून प्रांत कार्यालयात असलेल्या जुन्या नस्तीवरुन नविन सी फार्मेटमध्ये जात प्रमाणपत्र देण्याचे ठरल्याने उपोषणार्थींनी उपोषण मागे घेतले. याप्रसंगी अनिल चौधरी, डॉ.नरेंद्र कोल्हे, हर्षल पाटील, पल्लवी चौधरी, सविता भालेराव, विलास चौधरी, नीता पाटील, मयूर कोल्हे, अजय कोळी, डॉ.श्रीधर साळुंके, विशाल सोनवणे आदींनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवला.