नंदुरबार: नुकतीच राज्याच्या आदिवासी विकास मंत्रीपदी विराजमान झालेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी.पाडवी यांना जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पत्नींचा नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. शिवसेनेचे गणेश पराडकर यांनी के.सी.पाडवी यांच्या पत्नींचा पराभव केला आहे.
या निवडणुकीत के.सी.पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यात त्यांना धक्का बसला आहे. के.सी.पाडवी यांच्या पत्नींचा पराभव झाला असला तरी नंदुरबार जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. बहुमताकडे कॉंग्रेसने वाटचाल सुरु केली आहे. आता पर्यंत ११ जागांवर कॉंग्रेसचा विजय झाला आहे.