आदिवासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

0

माजी आमदार शिरीष चौधरी ; दिडशे महिलांनी घेतली भेट

फैजपूर- शासनाने आदिवासी भागाकडे दुर्लक्ष केले असून ज्या शासकीय योजना आदिवासी भागासाठी आहेद मात्र त्या अद्यापपर्यंत आदिवासी नागरीकांपर्यंत पोहोचल्या नाहीत वा त्याची त्यांना माहिती नाही त्याबाबत प्रयत्न करणार असून आदिवासी महिलांच्या अनेक समस्या असून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. आदिवासी भागातील दिडशे महिलांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता स्व.मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयात माजी आमदारांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आदिवासी भागातील महिला प्रत्येक गावातील महिला उपस्थित होती.

महिलांनी पुढे येणे गरजेचे
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी महिलांना सांगितले की, आदिवासी भागातील महिलांनी प्रकाशझोतात येण्याची गरज आहे. तेथील महिलांच्या हाताला काम मिळावे, त्यांचा उदरनिर्वाह व्हावा हा हेतू महिलांचा आहे मात्र शासन या घटकाकडे दुर्लक्ष करीत आहे. महिलांचे अनेक प्रश्न असून अजूनपर्यंत प्रलंबित आहे. यासाठी एक दिवस आदिवासी पाड्यातील महिलांसाठी भव्य कार्यक्रमाचे नियोजन करणार असल्याचे माजी आमदार म्हणाले. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील आदींची उपस्थिती होती.