साक्री । तालुक्यातील शेवडीपाडा या गावातील एका वीस वर्षीय महिलेवर अज्ञात 6 नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना दि 22 रोजी उघडकीस आली. दरम्यान या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला अज्ञात संशयिताविरुद्ध पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान साक्री पोलीसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांना दि.3 रोजी धुळे येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्या. डि पी काळे यांच्या न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
6 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश
शेवडीपाडा हे साक्री तालुक्यातील दुर्गम भागातील खेडे गाव आहे. या गावातील पीडित महिला हि दि 22 रोजी सरपण घेण्यासाठी उंभ्रठी शिवारात गेली होती. दुपारची वेळ असताना महिलेला एकटी पाहून नराधमांनी उचलून नेले व जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केला. दरम्यान दि 25 रोजी पीडित महिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धुळे यथे दाखल झाली असता, महिलेने पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांना आपबीती सांगितली असता धुळे पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या आदेशान्वये साक्री पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवली. पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अत्याचारकर्ते हे नाशिक जिल्यातील सटाणा तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी सहा पैकी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटकेत असलेल्या संशयित रावसाहेब गोरख भदाणे (19) उंभर्टी, शशी भिकन पवार (30)उंभर्टी, प्रल्हाद दादाजी गायकवाड (35) रागसुर,रावन जिवन सोनवणे (27),दावल जिवन सोनवणे (25) दोघ रा.तुंगेल यांना पाच ही सशंयितांना न्यायालयाने दि.6 पर्यंत कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ए.बी.वाघ यांनी काम पाहिले.