पिंपळनेर । येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेची बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राकुमार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी पिंपळनेर तालुका व शहर कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली.
यात पिंपळनेर तालुका अध्यक्षपदी देविदास सोनवणे, तर शहराध्यक्षपदी कन्हैया माळी, तालुका उपाध्यक्ष शंकर भगासाई, सचिव भरत मोरे, कोषाध्यक्ष विजय भारूडे, विभाग प्रमुख साहेबराव पवार, संघटक गौलाब माळी, सल्लागारपदी पुनाजी बिलाडे यांची तर चंदू शिंदे, रोमन मालचे, कांतीलाल कुवर, विश्वास सोनवणे, आनंदा सोनवणे, रविंद्र निकुम, बापू मोरे, रामचंद्र बागुल, धंजी पवार, मोहन माळी, भिकन पवार, दीपक सोनवणे, गोमा सोनवणे, जीवन कुवर व वसंत माळी आदींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. महिलामध्ये पिंपळनेर व साक्री तालुकाध्यक्ष जाईबाई चौरे, जिल्हा कार्यका रिणी सदस्य सरलाबाई बोरसे, लताबाई माळी यांची निवड केली.
संघटनेच्या नावाचा वापर
यावेळी राजकुमार सोनवणे यांनी संघटनेत नसताना ही काही समाज बांधव संघटनेच्या नावाखाली कोणासही त्रास देतात अशा उपद्रवीचा बंदोबस्त करावा व समाजाने शिक्षणाच्या प्रवाहात येऊन खरा विकास करावा असे आवाहन केले. सुत्रसंचालन बापू पवार तर आभार जीवन कुवर यांनी केले.