माथेरान । ज्या बळावर माथेरान मोठ्या दिमाखात प्रस्थापित आहे तेच रान परिसरातील लोक विस्थापित करण्याच्या मार्गावर असल्याने माथेरानचे उज्ज्वल भविष्य आगामी काळातच अंधकारमय होणार असुन स्थानिकांमध्ये याबाबत सध्यातरी चिंतेचे वातावरण दिसत आहे. 1850 मध्ये माथेरानचा शोध लावणारे ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर मॅलेट यांनी हे साजेसे नाव या स्थळास दिले आहे. परंतु हे समर्पक नाव पुसण्यासाठी आणण्यासाठी परिसरातील आदिवासी लोकांनी कंबर कसलेली असुन हा जंगलांनी परिपूर्ण व्यापलेला डोंगर मोकळा करण्यासाठी दैनंदिन झाडांच्या मुळावर कोयता अन कुर्हाडीचे घाव घालून हे जंगल संपविण्याचा कुटिल डाव खेळत आहेत.
दर वर्षी माथेरानकर पावसाळ्यात थोर निरूपणकार महाराष्ट्र भूषण आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्य बैठकीतील परीवारांकडुन वृक्षारोपण आणि संवर्धन केले जात आहे. तर नगरपालिकेच्या माध्यमांतून सुद्धा फक्त वृक्षारोपण करण्यात येत असते. त्यांच्यामुळेच संपुर्ण परिसरात खर्या अर्थाने ठिकठिकाणी हिरवळ दिसायला लागलीय परुंतु माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदीवाशी वाड्यांमधे वृक्षारोपणाचे अन् झाडांचे महत्व अद्याप कळलेले दिसत नाही जुम्मा पट्टी, माणगाव वाडी येथील काही आदिवासी दर दिवशी चाळीस ते पन्नास आदीवासी महीला पुरुष राजरोसपणे येथील वाँटरपाईपच्या वरच्या भागात सर्रासपणे जिवंत झाडे तोडुन रोज माथेरान घाट रत्स्यावरुन लाकडाच्या मोळया तसेच मोठाले ओंडके घेऊन जात असतात.
वनविभागाचे होतेय दुर्लक्ष
माथेरान, नेरळ फॉरेस्ट ऑफीसर कर्मचारी वर्ग मात्र हे सर्व माहीत असताना या जबाबदारीच्या महत्वाकांक्षी गोष्टींकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. माथेरान वनसमितीच्या होणार्या वर्षातील प्रत्येक सभेमध्ये या विषयी ठराव केला जातो. परूंतु, वनसमितीलाही फॉरेस्ट डीपार्टमेंट दाद देत नाही. जाणार्या खासगी गाड्यांचे भुभाडे वसुल करायला दस्तुरी येथे वनखात्यातील कर्मचारी बसलेले असतात. माथेरानमध्ये पुर्वी प्रत्येक फॉरेस्ट कर्मचार्याची विभागवार जंगलात फेरी असायची परंतु आता सर्वांच्या ड्युट्या फक्त दस्तुरी येथेच गाड्यांचे भुभाडे वसुली करीता असतात.