आदिवासी वसतीगृहातून मोबाईल चोरी

0

जळगाव – शासकीय अदिवासी वसतीगृहातून एकाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला असून याबाबत रामांनद नगर पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवदास देवराम कोचूरे रा. शासकीय अदिवासी वसतीगृह, शिवकॉलनी यांचा 7 हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.30 ते 7.30 वाजेदरम्यान चोरून नेला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ राजेश भावसार करीत आहे.