आदिवासी वस्तीगृहात आदिवासी दिन साजरा

0

चाळीसगाव। येथील हिरापुर रोडवरील आदिवासी मुलांचे शासकिय वस्तीगृहात 9 आँगस्ट हा जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात आदिवासी क्रांतिविर धरती आबा बिरसा मुंडा यांचे प्रतिमा पुजनाने करण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी व कार्यक्रमाचे अध्यक्ष वस्तीगृहपाल एस.आर.तायडे यांनी मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे म्हणुन रविंद्रभाऊ जाधव, पी.एन.पल्हाळ, सुत्रसंचालन धवया अहिरे, रविंद्र गायकवाड तर आभार प्रविण अहिरे यांनी मानले. या कार्यक्रमास कर्मचारी आर.व्ही.देवरे, सी.डी.चव्हाण, जे.पी.जावळे, ईदास पावरा, गोरख गायकवाड, सांडू तडवी, रविंद्र निकम,छगन भिल्ल, पांडूरंग पावरा, रुपसिंग पावरा, संदिप गावित, समाधान पवार व विद्यार्थी उपस्थित होते.