प्रतिनिधी तळोदा :–
राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी धडगाव येथे जात असताना तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची संवाद साधून चर्चा व इतर केले. प्रत्यक्षात मंत्री महोदयाशी चर्चा केल्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील भारावून गेले.
शासकिय कार्यक्रमासाठी धडगाव येथे जात असताना रस्त्यालगत असणाऱ्या तळोदा तालुक्यातील कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली.यावेळी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ शशिकांत वाणी, कोठार आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठे,आदीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. विद्यार्थांचा परिचय विचारत त्यांनी समस्यांबाबत विचारणा केली.विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रश्न देखील विचारले.यावेळी त्यांनी शिक्षकांशीही शैक्षणिक मुद्यांवर हितगुज केले. सर्व शिक्षकांनी मंत्री महोदय यांच्याशी नवीन वेळापत्रक याबाबत चर्चा केली असता कोणालाही त्रास देण्याच्या हेतूने नवीन वेळापत्रक राबवले नसून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले.दरम्यान,आगामी काळात याबाबत विचार करू असे देखील आश्वासन त्यांनी यावेळी शिक्षकांना दिले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते अभावी संपूर्ण आदिवासी विकास विभाग बदनाम होतो,हे चित्र बदलावे म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत उपायोजना सुरू आहेत.त्याच्याच एक भाग म्हणून शिक्षकांचे ज्ञान आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या विषयांचे ज्ञान अपडेट राहावे,यासाठी त्यांच्या देखील परीक्षा घेण्यात येणार आहेत.पर्यायाने यांच्या फायदा विद्यार्थ्यांना होईल,हा दृष्टिकोन ठेवून या गोष्टी राबवल्या जात आहेत.