नवापूर। आदिवासी विद्यार्थ्यांना फसवणुक करणार्यांवर कायदेशीर करुन शाळा सोडल्याचे दाखले परत मिळवुन देणे बाबतचे निवेदन तहसिलदार प्रमोद वसावे व पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना नवापुर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी यांनी दिले. यावेळी सोबत सत्यानंद गावीत, गुलाबसिंग वसावे, आलु गावीत, के.टी.गावीत, हे पण उपस्थित होते. या प्रसंगी सर्व विद्यार्थी यांनी तहसिल कार्यालयाचा आवारात गर्दी केली होती.
शिक्षण मोफत देण्याचे दिले आश्वासन
आदिवासी विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सर्व आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2013-14 व 2014-15 या शैक्षणिक वर्षात बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करीत असतांना संगीता विजय वळवी व विशाल विजय वळवी मु.पो धानोरा (ईसाईनगर, ता.जि.नंदुरबार) व मोहम्मद कौशम मु.चेन्नई (तामिळनाडू) यांनी आमच्यासाठी संपर्क साधुन 5हजार रुपये भरुन बँगलोर (कर्नाटक) येथे प्रवेश मिळवुन देवू तसेच पुढील सर्व शिक्षण मोफत उपलब्ध करुन देवु व महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाकडुन शिष्यवृत्ती ही मंजुर करुन देवु असे आश्वसन देवुन आम्हांला विश्वासात घेतले. त्यांच्या सांगण्यावरुन संगीता वळवी व विशाल वळवी व मोहम्मत कौशम यांच्या समक्ष बॅगलोर येथील हिना कॉलेज व शांतीधाम कॉलेज या नसिंग कॉलेजात प्रवेश घ्यावयास लावले.
वसतीगृहात सुविधासाठी विद्यार्थ्यांचा छळ
मिळालेल्या माहितीच्या आधारे कॉलेजात प्रवेश घेतल्यानंतर तीन ते चार महिने सुरळीतपणे शिक्षण चालल्यानंतर सदर कॉलेजमधुन शैक्षणिक फी ची मागणी करण्यात येवु लागली व आमच्या छळ सुरु झाला. सुरुवातील आश्वसनाप्रमाणे मोफत शिक्षण व शासकिय शिष्यवृत्ती न देता आमचा छळ सुरु झाला. वसतीगृहात जेवण व्यवास्थीत न देणे, कॉलेजला बसु न देणे असे प्रकार सुरु केले व अंतिमत:परिक्षेत बसु दिले नाही पुढील सर्व धोके ओळखुन आम्ही सदर कॉलेज मधुन एल सी देण्याची विनंती केली पंरतु आम्हांला कॉलेज व वसतीगृहातुन हाकलुन दिले. गेले दोन वर्ष आमचे शैक्षणिक नुकसान झाले असुन शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट इत्यादी नसल्यामुळे आमचे पुढील शिक्षण व पर्यायाने भवितव्य धोक्यात आले आहे. मागील दोन वर्ष आमची वणवण भटकंती सुरु आहे. आमचे शैक्षणिक प्रमाणपञ परत मिळवुन द्यावे. फसवणुक करणार्या दलालांवर कायदेशीर कारवाई व कागदपत्रे न मिळाल्यास न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर यांच्या स्वाक्षर्या
निवेदनावर विद्यार्थी राकेश वसावे, निलेश गावीत, मिलिंद गावीत, शाम गावीत, दिपक वसावेे, जॉन गावीत, राहुल गावीत, सनराज गावीत, बथुवेल गावीत, सचिन गावीत, संजय गावीत, प्रेम गावीत, जयसिंग गावीत, दिनेश गावीत, तुषार वसावे, विश्वास गावीत असे 57 विद्यार्थीचा स्वाक्षर्या आहेत.