चोपडा । शासकिय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थ्यानी गेल्यावर्षी पायी मोर्चा काढला. हा मोर्चा चोपडा येथून निघून यावल येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर काढणार असून त्यानंतर यावल तहसिल कार्यालयासमोर उपोषण मांडणार आहे. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी असलेल्या वसतीगृहात प्रवेश मिळावा अथवा प्रवेशात वाढीव जागा द्यावी अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले असल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून मिळाली आहे. चोपडा तालुक्यात विविध शैक्षणिक शाखा उपलब्ध असून आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थीनी जास्त प्रमाणात प्रवेश घेत असतात. परंतू त्या वसतिगृहामध्ये मुलाचे 200 तर मुलींचे 75 एवढ्या संख्येची मर्यादा असल्याने ही मर्यादा वाढविण्यात यावी.
शासकिय आदिवासी वसतीगृहात विविध समस्या
गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी करण्यात आली होती मात्र त्याच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना हा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे शासकिय अदिवासी मुलींचे वसतीगृहातील गृहपाल मनिषा सैदाणे यांची तत्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर शासकिय आदिवासी विद्यार्थ्याना वसतिगृहातील वंचित असलेले सर्व विदयार्थाना तात्काळ प्रवेश देण्यात यावा, शाासकिय आदिवासी मुलांचे वसतिगृहात 500 व मुलीसाठी 250 वाळीव कोठा मंजूर करण्यात यावी, वसतिगृहातील रिक्त जागा असलेले गृहपाल लिपीक शिपाई वॉचमेन यांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी, गॅप असलेल्या विदयार्थी व विदयार्थीनीना प्रवेश मिळावा यासाठी वरचा स्तरावर सतत प्रयत्न करावा, एम.एस सीआयटी व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन करण्यात यावे. शासकिय आदिवासी मुलामुलीचे वसतीगृह येथे कॉम्प्युटर उपलब्ध करुन देण्यात यावी, वसतीगृहात फोन व लाईट उपलब्ध करुन देण्यात यावी, शासकिय आदिवासी मुलींचे वसतिगृहात येथे 4 महिन्याचा निर्वाह भत्ता मिळावा यासह इतर मागण्या या निवेदनावर नमूद करण्यात आले आहे.