आदिवासी विद्यार्थ्यांनी केले अन्नत्याग आंदोलन

0

आदिवासी वसतीगृहात सुविधांचा अभाव

चाळीसगाव । येथील हिरापूर रोडवरील शासकिय आदिवासी मुलांचे वसतीगृहात अनेक असुविधा असुन नित्कृष्ट जेवण दिले जात असल्याने १४ पासुन विद्यार्थ्यांनी अन्नत्याग उपोषण केले होते. शुक्रवारी १५ रोजी यावल येथील प्रकल्प अधिकारी यांनी वसतीगृहाला भेट देवुन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे आंदोलन तात्पुरते थांबवले आहे. येथील हिरापूर रोडवर आदीवासी मुलांचे शासकीय वसतीगृह आहे त्यात एकूण ४२ विद्यार्थी राहतात या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी बोअरचे पाणी प्यावे लागत असल्यामुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. इमारतीची स्थिती अतिशय बिकट झाली असुन छत गळके झाले आहे. ईमारतीच्या मागे पुढे करकश आवाज येत असल्यामुळे अभ्यासात व्यत्यय होतो. त्यामुळे त्वरीत ईमारत बदलून मिळावी अशी प्रमुख मागणी विद्यार्थींची आहे.

मोहिमेस यांची होती उपस्थिती
स्नानगृह, शौचालयाचे दरवाजे अर्धे तुटलेले आहेत. गाद्या अतिशय खराब झालेल्या असून पलंग तुटलेले आहेत. प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे व सहाय्यक महेश राणे यांनी येवुन वसतीगृहाची पाहणी करुन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. त्या समस्या त्वरीत सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले असल्याचे अनिल पावरा यांनी सांगीतले. विद्यार्थ्यांना जळगाव येथील रत्ना महिला बचत गटामार्फत जेवण पुरवले जात होते ते आता बंद करण्यात आले असुन चाळीसगाव येथील शारदा महिला बचत गटाकडुन आता विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जाईल त्याची रितसर पूर्तता केली जाणार असुन नवीन ईमारत बाबत लवकरच निवीदा काढणार असल्याची माहिती वसतीगृह अधीक्षक सुशील तायडे यांनी दैनिक जनशक्तीशी बोलतांना दिली.