आदिवासी विद्यार्थ्यांसोबत झेड.पी.सदस्य सोनवणे थिरकले

0

जळगाव। चोपडा तालुक्यातील जिरायतपाडा येथे शाळा निरिक्षणासाठी गेलेले अकुलखेडा-चुंचाळे गटाचे जिल्हा परिषद आणि शिक्षण समिती सदस्य गजेंद्र सोनवणे यांनी आदिवासी दिन आदिवासी विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. आदिवासी विद्यार्थ्यांसोबत त्यांनीही आदिवासी गाण्यावर ठेका धरला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गाजरे, केंद्रप्रमुख वंदना बाविस्कर, रावसाहेब पाटील, मुख्याध्यापक दिलदार आदी उपस्थित होते.

समस्या सोडविण्याचे आवाहन
दरम्यान सोनवणे यांनी बोरअंजटी, वैजापुर, देवगड, देव्हारी व जिरायतपाडा शाळांना भेट देवून पाहणी केली. विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच अडीअडचणींबाबत प्रभारी गटशिक्षण अधिकारी गोकुळ ठाकरे यांच्याशी चर्चा करुन समस्या सोडविण्याचे आवाहन केले.