आदिवासी शाळांना आमदार सोनवणे यांच्याहस्ते बेंच भेट

0

चोपडा । तालुक्यातील पैसा अंतर्गत 27 शाळा पैकी आज नागलवाडी केंद्रातील 13 शाळा मधील 6 शाळांना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नमुळे नाविन्य पूर्ण योजना लाभामधून 162 बेंच 8 लाख रु किंमतीचे आज शासकीय विश्राम गृहात आदिवासी जि.प शाळाना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते भेट देण्यात आले. यामध्ये जि.प.गोर्‍यापाडा शाळेस 44 बेंच, खार्‍यापाडा शाळा 35 बेंच, वैजापूर शाळा 13बेंच, मुळ्याउतार 13बेंच, मेलाणे 6 बेंच, जिरायतपाडा शाळा 51 बेंच भेट देण्यात आले.

या वेळी तहसीलदार दीपक गिरासे गटविकासाधिकारी ए.जी.तडवी, गटशिक्षणधिकारी एस.सी.पवार, शिक्षणविस्तार अधिकारी गो.ची.ठाकरे, प.स.सदस्य रामचंद्र भादले, उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, नगरसेवक राजाराम पाटील, किशोर चौधरी, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, केंद्र प्रमुख हरीराम भादले, वैजापूर शाळेचे शिक्षक हरीराम भादले, गुरुदत्त निंबाळे, खार्‍यापाडा शाळेचे खुमानसिंग बारेला, विजय कचवे, मुळ्या उतार शाळेचे कुवरसिंग बारेला, गोर्‍यापाडा शाळेचे जेमसिंग बारेला, किरण बाविस्कर आबा देशमुख, विकास पाटील, राजू जयस्वाल, विकी शिरसाठ, पं.स.चे स्वप्नील महाजन आदींची उपस्थिती होती.