आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी उत्थान योजना सुरू

0

महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर राज्यातील सर्वच व्हॅटिकन विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना

मुरुड – रायगड जिह्यातील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार पुढे आले असून त्यांच्या साठी उत्थान योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर राज्यातील सर्वच व्हॅटिकन विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. तरीही सर्वच योजना ह्या मूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी कोकण विभागातील विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी एक अभिनव योजना राबविली आहे.

आदी कातकरी समाजाला शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी कातकरी उत्थान योजना नामक योजना आणली आहे. या योजनेमुळे कोकण विभागातील कातकरी समाजाला शासकीय योजनांचा प्रत्यक्ष तात्काळ लाभ मिळणार आहे.

कातकरी समाजाच्या बदलण्यासाठी शासकीय मदतीची गरज
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी एक सभा घेतली आणि त्या बैठकीत या योजनेचा शुभारंभ केला. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. कातकरी समाजाने शिक्षणाकडे त्यांचे लक्ष वळवले आहे. आता हे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहे. समाज बदलण्यासाठी शासकीय मदतीची गरज आहे. यासाठी शासनाचा प्रतिनिधी थेट त्यांच्या पर्यंत पोहचून हक्काच्या योजनेचा लाभ त्यांना दयावे,यासाठीच उत्थान योजना आहे. कातकरी समाज पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यात आहेत. सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील काही कातकरी समाजबांधव यांच्याकडे स्वतःचे घर, नसल्याने त्यांना शासकीय योजनेतून घरही दिले आहे.

शासकीय यंत्रणेची धावपळ
भटकंती असलेल्या या समाजास शासकीय योजना पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रनेला धावपळ करावी लागते. तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कृषिविभागाचे कर्मचारी अशा चार जनांचे पथके तयार करून ही पथके प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतील. त्यांच्यापर्यंत कुठल्या योजना पोहचल्या आहेत. तसेच कोणते लाभ देता येईल याचे पाहणी करतील. भट काढणीनंतर बरेच कातकरी हे स्थलांतरीत होत असतात. त्याचपूर्वीच ही मोहीम संपविण्यात येईल. या महिन्याअखेर ही मोहीम संपविण्यात येईल.