शहादा । आदिवासी समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासापासून आजही दूर आहे. 21 व्या शतकाच्या वाटचालीवर समाज हा आदिवासीपण विसरत आहे. समाजाने परंपरेचे व संस्कृतीचे रक्षण करावे असे प्रतिपादन लेखक वाहरू सोनवणे यांनी केलेे. ते शहादा तालुक्यातील उनपदेव येथे वीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस प्रसंगी सोनवणे बोलत होते. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, रा. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, जि. प. उपाध्यक्ष सुहास नाईक, जेलसिंग पावरा, डोंगर बागुल, वनिता पटले, केशरसिंग ठाकरे, प्रा. भीमसिंग वळवी, गुंताबाई ठाकरे, सतीश वळवी, अभिजीत वसावे, सतीश पवार,सुनिता पवार, ईश्वर पवार, जमन ठाकरे, वानसिंग पवार, अँड. राजेंद्र ठाकरे, ठगीबाई वसावे, सुभाष नाईक सह मान्यवर उपस्थित होते.
तरूण पिढीवर जबाबदारी
साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी म्हटले कि, आदिवासी समाज शिक्षण, आरोग्य व शासनाच्या योजनांच्या लाभापासून कोसो दूर आहे. आदिवासी समाजाने आजपर्यंत देशासाठी बलिदान देत आला आहे. आदिवासी स्त्री अजून शिक्षण विकास व आरोग्य यापासून लांब आहे. बदलत्या काळात आदिवासी परंपरा व संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे असे वाहरू सोनवणे यांनी म्हटले आहे. आदिवासी एकता परिषदेतर्फे आयोजित वीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस उत्सव कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार दामू ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य लढ्यात योगदान
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनी म्हटले कि, आदिवासी समाजातील अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्यसाठी बलिदान दिले आहे. समाजाने देशाला अनेक वीर देवून देखील समाजाच्या विकस पाहिजे तसा होत नाही. शेठ, सावकार, दलाल यांच्या विरोधात लढा दिला पाहिजे. आदिवासी समाज न्याय हक्कासाठी लढा देण्यास नेहमी तयार असणार आहे. सर्वांनी एकत्र आले तरच खरे वीरांना श्रद्धांजली दिली असे होणार आहे.