आदिवासी समाजाशी समरस होवून जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी

0

नंदुरबार । नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून आदिवासी समाजाच्या विकासाचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपली भुमिका अधिक एकरुप करुन आदिवासी समाजामध्ये समरस होवून पार पाडली पाहिजे असे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे, उपस्थित होते.

बोलीभाषेतून संवाद साधा
उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी माहिती देतांना सांगितले की, 9 ऑगस्ट, 1995 पासून जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात झाली असून जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के आदिवासी दारिद्र्य रेषखालील असून हे सर्व विविध समस्यांनी पिढीत आहेत. म्हणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तळागाळात जावून या आदिवासी समाजाशी एकरुप हावून त्यांच्या बोलीभाषेमध्ये त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्व अधिकारी सामाजिक डॉक्टरांची भुमिका पार पाडणे गरजेचे आहे असे उपजिल्हाधिकारी डॉ. थोरबोले यांनी सागितले.