निजामपुर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील भामेर येथील आदीवासी महिलेची शेतजमिन खर्चासह परत मिळवुन व शेतजमिन ताबा घेणारे विरोध प्रतिबंधक कारवाई करणयात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीसकड़े सामाजिक कार्यकता मनिषा गुलाबराव पाटील यांनी तक्रार केली आहे.
भामेर येथील आदीवासी शेतकरी महिलेची शेतजमिन गट नं 268/4 या शेतजमिनीवर बेकायदेशीर ताबा व अतिक्रमण करून आदीवासी महिलेला चित्राबाई सुका भील याच्या परिवाराला भुमिहिन केले आहे व तिचे संसार उदवसत केले आहे.दि 1 जुलै रोजी साकी तहसिल कार्यालयसमोर चिञाबाई सुका भील हे आत्मदहन करणार होते पंरतु तहसीलदार भोसले यांनी मध्यस्थी करून आत्मदहन करू दिले नाही.आदिवासी महिलेला न्यायासाठी न्यायालयात जाण्याचे सांगितले. आदीवासी भील महिला निराधार असुन कुठलेही आर्थीक पाठबळ नाही.
निकालासाठी प्रतिक्षा करावी लागणार
महिलेने न्यायासाठी जावे तर कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. महसुल प्रशासनाने आदिवासी महिलेची भामेर शिवारात गट नं. 268/4 ही शेतजमिनीवर जमिनी परत मिळवुन द्या या जागेवर सौर उर्जा प्रकल्पाने दलालाच्या सहाय्याने ताबा घेतला आहे. आदिवासी महिलेला व परिवाराला भुमीहिन केले आहे. महिलेची पिळवणूक अन्याय अत्याचार करणार्यावर कंपनीचे दलालाला अटक करून प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी. याबाबत सौरव उर्जा कंपनी व कंपनीचे दलाल जयदेव बेहेरे,श्रीकांत वाघ, भामेरचे सरपंच मनोज सोनवणे याच्या विरोध तक्रारी केल्या आहेत.