आदीशक्ती मुक्ताईचे भक्तीमय वातावरणात आगमन

0

मुक्ताईनगर। आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान कोथळी येथून सालाबादाप्रमाणे आषाढीएकादशी निमित्त भुवैकूंठ पंढरीला गेलेली मुक्ताई पालखीचे मुक्ताई शरणम.. मुक्ताई, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात शनिवार 29 रोजी भक्तीमय वातावरणात स्वस्थळी मुक्ताईनगरीत आगमन झाले. मुक्ताईनगरीत ठिकठिकाणी स्वागत कमानी, तोरणे, ध्वजपताका, स्वागतफलक लावल्याने भक्तीमय वातावरण झाले होते. तसेच चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हाती टाळ घेऊन मुक्ताईचा गजर करीत पालखीचे स्वागत केले.

मुक्ताईदिंडी आगमन सोहळ्यात 150 ते 200 दिंड्या सहभागी
आगमन सोहळ्यात 150 ते 200 दिंड्या सहभागी झाल्या. यावेळी सजीव देखावे व ड्रेसकोड दिंड्या सहभागी झाल्या होत्या. मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र पाटील व जिल्हा बॅकेच्या चेअरमन अ‍ॅड. रोहीणी खडसे-खेवलकर यांनी रथ व पालखीचे पुजन केले. यावेळी मुक्ताई पादुकांजवळ खा.रक्षा खडसे यांनीसुद्धा पुजन केले. जि.प.उपाध्यक्ष नंदु महाजन व भाजपातर्फे केळीवाटप करण्यात आली. शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, छोटु भोई यांनी पुजन केले. यावेळी दिंडी स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक महासिद्ध भजनी मंडळ, पलसोडा ता. संग्रामपुर यांनी पटकावल यांना 11 हजार 111 रुपयांचे पारितोषिक, द्वितीय क्रमांक लक्ष्मीनारायण भजनी मंडळ, लोणी ता. बुर्हानपूर यांना 7 जहार 777 रुपये, तृतीय क्रमांक श्री संत नागेश्वर महाराज भजनी मंडळ, वरवट बकाल ता. संग्रामपुर यांना 5 हजार 555 रुपये, महीला गटात प्रथम क्रमांक आदिशक्ती महीला भजनी मंडळ, उमरा ता. संग्रामपूर यांना 7 हजार 777 रुपयांचे पारितोषिक, द्वितीय क्रमांक प्राप्त आदिशक्ती मुक्ताई भजनी मंडळ एकलारा ता. संग्रामपूर 5 हजार 555 रुपये, तृतीय – श्री गजानन महीला भजनी मंडळ गाळेगाव बु व भारतीय सांस्कृतिक भजनी मंडळ – तळवेल तालुका भुसावळ 3 हजार 333 रुपये, बाल गटात प्रथम – श्री संत गोविंद महाराज भजनी मंडळ भंडारी ता खामगाव 5 हजार 555 रुपये, द्वितीय – श्री बाल भजनी मंडळ खिरवड ता रावेर 3 हजार 333 रुपये, तृतीय – श्री विठ्ठल रुख्मिणी भजनी मंडळ लोहारखेडा ता मुक्ताईनगर 2 हजार 222 रुपये व प्रत्येक दिंडीस संस्थानतर्फे प्रमाणपत्र तसेच पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक दिंडीस स्व. निखिल खडसे स्मरणार्थ माजी मंत्री एकनाथ खडसे यांचेकडुन 1 हजार एक रुपये रोख व प्रशस्तीपत्र कोथळी मंदीरात झालेल्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.