चेन्नई : अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए सायबर हेरगिरीसाठी एक असे तंत्र वापरत आहे, ज्यामुळे आधार कार्डाचा सगळा डेटा त्यांना मिळाला असावा, अशी माहिती विकीलीक्सने प्रकाशित केली. भारत सरकार आणि गुप्तचर यंत्रणांसाठी ही माहिती धक्कादायक आहे. मात्र, अधिकृत सूत्रांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
क्रॉस मॅच कंपनीमुळे संशय
विकीलीक्सन जो अहवाला प्रसिध्द केला आहे त्यानुसार अमेरिकन कंपनी क्रॉस मॅच टेक्नॉलॉजीने सायबर हेरगिरीसाठी हे तंत्र विसकित केले आहे. हीच कंपनी आधारची नियामक संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियासाठी बायोमेट्रिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देते. विकीलीक्सने एक लेख ट्विट केला आहे. यात क्रॉस मॅचचा भारतातील पार्टनर स्मार्ट आयडेंटिटी प्रा. लि. चा उल्लेख आहे. या कंपनीने आधार डेटाबेसमध्ये 12 लाख भारतीय नागरिकांचा समावेश केला आहे. सीआयएच्या हेरांनी भारताच्या राष्ट्रीय ओळखपत्राचा डेटाबेस चोरला का? असे ट्विट विकीलीक्सने केले आहे.
आधारची माहिती सुरक्षित
याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, ही माहिती लिक झालेली नसून तो एका वेबसाइटवरचा अहवाल आहे. क्रॉस मॅच बायोमेट्रिक ही कंपनी डेटा साठवणार्या डिव्हाईसची जागतिक पुरवठादार कंपनी आहे. सर्व माहिती एन्क्रिप्टेड स्वरुपात आधारच्या सर्व्हरवर साठवली जात असल्याने ती एकत्रितपणे कंपनी किंवा अन्य कोणाहीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हा अहवाल निराधार असून, आधारची माहिती सुरक्षित ठेवली जाते.