‘आधार’चा सर्व्हर झाला डाउन

0

कराड । सध्या आधार कार्डची गरज सर्वत्र भासत आहे. त्यामुळे आधार कार्ड नसणारे नागरिक सक्तीने आधार कार्ड काढत आहेत. बहुतांश जणांनी आधार कार्ड काढली आहेत. सध्या खासगी ठिकाणी आधार कार्ड काढण्याठी गेल्यावर तेथील सर्व्हर डाउन आहे, सध्या आधार कार्ड काढणे थांबवायला सांगितले आहे, असे सांगितले जात आहे. शासकीय कार्यालयातही ही प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे आधार कार्ड नसलेल्यांची मोठी अडचण निर्माण झाली असून शासनाकडूनची ही प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

प्रक्रिया आहे बंद
अजूनही ग्रामीण भागातील, अशिक्षित, वाडी-वस्तीवर राहणार्‍या अनेकांची आधार कार्ड काढलेली नाहीत. त्यामुळे त्यांना सध्या शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्याचबरोबर बँकेतील व्यवहारही करता येत नाहीत. त्यामुळे त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. सध्या आधार कार्ड काढण्यासाठी संबंधित ठिकाणी गेल्यावर ‘सर्व्हर डाउन आहे’, ‘सध्या आधार कार्ड काढणे थांबवायला सांगितले आहे’, असे सांगितले जात आहे.