आधारची सक्ती केल्यास १ कोटींचा दंड!

0

नवी दिल्ली-आधार कार्डबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय दिले आहे. आता यापुढे बँक खात्याशी किंवा मोबाईलशी आधार लिंक करण्याची सक्ती नसणार आहे. मात्र जर बँक आणि टेलिकॉम कंपनी सक्ती करत असेल तर त्यांच्यावर १ कोटी रुपयाचे दंड भरावे लागणार आहे.

तीन ते दहा वर्ष देखील शिक्षा होऊ शकते. आता यापुढे बँक खाते उघडण्यासाठी किंवा सीमकार्ड वगैरे घेण्यासाठी आधार व्यतिरिक्त इतर कागदपत्रे देऊ शकतात. केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कायद्यात सरकारने बदल केले आहे.