नवी दिल्ली- दीर्घ काळापासून चर्चेचा विषय असलेल्या आधार कार्डच्या वैधानिकतेवरून सर्वोच्च न्यायालय आज आपला निर्णय देणार आहे. आधारच्या वैधानिकतेला आव्हान देणाऱ्या २७ याचिकांवर सुमारे चार महिन्यांपासून सुनावणी सुरु होती. मॅरेथॉन चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाने मे मध्ये निर्णय सुरक्षित ठेवला होता.
या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्ये सुरु झाली होती. त्यानंतर सुमारे ३८ दिवस याप्रकरणी सुनावणी चालली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या पीठाने सुनावणी केली. संविधानानुसार गोपनीयता हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. आधार कार्ड गोपनीयता कायदाचा भंग ठरतो का याचा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे.
आधार कार्डमुळे सामान्य जीवन प्रभावित झाले आहे. अशावेळी हे संपुष्टात आणले पाहिजे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने आधार कार्डच्या बाजूने अनेक मुद्दे मांडले आहेत. आधार कार्डमुळे लाभार्थींना विना अडचण सबसिडी मिळते, हा सरकारचा सर्वांत मोठा मुद्दा आहे.