आधारभूत धान्य खरेदीला मुदतवाढ न दिल्यास रास्ता रोकोसह जनआंदोलन

0

रावेर : शेतकरी हितासाठी सुरू करण्यात आलेले आधारभूत धान्य खरेदी केंद्र 31 डिसेंबर रोजी बंद करण्यात आले मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांकडील मालाची अद्यापही खरेदी झालेली नाही त्यामुळे पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेने अपर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे मंगळवारी केली. मागणीची दखल न घेतल्यास रास्ता रोकोसह जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.