आधारवाडी कारागृहातून निसटलेल्या दोन फरार कैद्यांना तामिळनाडूत अटक

0

कल्याण | कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून 23 जुलै रोजी पळून गेलेल्या दोन कैद्यांना महिनाभरानंतर तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे .

२३ जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या आधारवाडी कारागृहाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केबल तोडून या केबलचा दोरखंडासारखा वापर करून कारागृहच्या २५ फूट उंच सरक्षण भिंतीवरून उडी मारून मनीशंकर सेल्वराज नाडर २० आणि डेव्हिड मुरगेश देवेन्द्र्ण २० या दोन कुख्यात कैद्यांनी पळ काढला होता. यानंतर या आरोपींनी कोन येथून एका दुचाकीस्वाराची गाडी चोरून पनवेल गाठून पनवेलमधून एका चारचाकी चालकाला मारहाण करून त्याची गाडी चोरली होती. तेव्हापासून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. मात्र चारच दिवसांनी या आरोपींनी थेट तामिळनाडूमध्ये घरफोडी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उघड झाल्यानंतर हे आरोपी तामिळनाडूत पोचल्याचे स्पष्ट झाले होते. या कुख्यात गुंडांना अखेर तामिळनाडू पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त त्रिमुखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या दोन्ही आरोपीना तामिळनाडू पोलिसांनी अटक केल्याच्या महितीला दुजोरा दिला. या दोन आरोपींना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याना महाराष्ट्र पोलिसाच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली