कल्याण : घनकच-यावर प्रकि्रया करण्यासाठी केडीएमसी क्षेत्राात १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. असे असताना नगरसवेकांच पुढाकाराने त्यांच्या प्रभागात कचरामुक्तीचा श्रीगणेशा झाला आहे. ओल्या कच-यापासुन सेंद्रीय खताची निर्मिती आणि गांडूळ खताच्या प्रकल्पाचेही नुकतेच उदघाटन करण्यात आले. त्याचबरोबरीने आधारवाडर डम्पींग बंद करण्याच्या प्रक्रियेलाही प्रारंभ झाल्याने महापालिका प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
केडीएमसी हददीत कच-याचा प्रयन गंभीर आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशनंतरही योग्य कार्यवाही झालेली नाही. आधारवाडी डम्पींग बंद करणसाठी होत असलेला विलंब पाहता सर्वपक्षीय नगरसेवकांच्या रोषाना प्रशासनाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. मात्र आता उशिरा का होईना नगरसेवकांच्या पुढाकारांने कचरामुक्त प्रभागाचा श्रीगणेशा झाला आहे. रामबाग प्रभागाच्या नगरसेविका वैजयंती गुजर घोलप यांच्या प्रभागातील सेंद्रीय खत निर्मितीचा प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच महापौर राजेंद्र देवळकर यांच्या उपस्थितीत नव एव्हरेस्ट सोसायटीतील ८८ सदनिकांमध्ये निर्माण होणा-या कच-यावर प्रकिया सुरु झाली आहे तसेच अन्य दोन इमारतींमध्येही हा प्रकल्प सुरु झाला. रामबाग सिंडीकेट प्रभागाच्या नगरसेविका वीणा जाधव यांच्या पुढाकारानेही त्यांच्या प्रभागात गांडूळ खत प्रकल्प उभारण्यात आला आहे. राणी लक्ष्मीबाई उदयानातील प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती मनुसृष्टी या पर्यावरण संस्थेव्दारे केली जाणार आहे. उदयानात दररोज निमार्ण होणारा पालापाचोळा नेहती जाळत असे पण आता त्याचा वापर गांडूळ खतासाठी केला जाईल असे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपअभियंता मिलिंद गायकवाड यांनी सांगितले. तसेच आधारवाडी डंम्पींग बंद करण्यासाठी सातत्याने मागणी होत आह. उच्च न्यायालयानेही ते तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने दिरंगाईने का होईना कार्यवाहिला प्रारंभ झाला आहे. कच-याची शास्त्रोत्क पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी सौराष्ट्र इनव्हायस प्रा लि या कंपनीला याबाबत कंत्राट देण्यात आले कंपनीने सुरक्षा अनामत रक्कमही भरली आहे. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे.