वाडा । विविध शासकीय योजना व बँक खातेदारांसाठी आधाार कार्ड गरजेचे असल्यामुळे आधार वाडा तालुक्यात आधार कार्ड नोंदणीसाठी केंद्र उभारावे अशी मागणी जनतेकडून होत आहे. तसेच शेतकरीवर्गाला कर्जमाफी फॉर्म भरण्यासाठी आधारकार्डाची नोंदी करिता अडचणी निर्माण होत असल्यामुळे कर्जमाफी अर्जाची प्रक्रिया थंडावत आहे. ठसे अपडेट करण्यासाठी व नव्याने आधार कार्ड सुधारितकरिता आधार कार्ड केंद्र उभारावीत अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष अनंता भोईर यांनी केली आहे.
वाडा तालुक्यात वर्षभरापूर्वी जनतेने काढलेले आधार कार्ड हे नावात बदल, पत्त्यामध्ये बदल, जन्म तारखांमध्ये बदल झालेले दिसून आलेत. तर काही लोकं नव्याने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी व नव्याने काढण्यासाठी वाडा तालुक्यात आधार कार्ड केंद्र शोधार्थ फिरत असतात. कधी जनता बाहेरील तालुक्यात आधार कार्ड केंद्राला भेटी देत असतात. असे अनंता भोईर यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात वाड्यात ही आधार केंद्र सुरू ठेवण्यात आली मात्र महीनाभरापासुन ही केंद्रे बंद आहेत. त्यामुळे इथल्या आधार कार्ड धारकाला आपले नव्याने अपडेट व नव्याने लहान मुलांची आधार कार्ड नोंदणी रखडली आहेत. या सदोष प्रक्रियेमुळे कर्जमाफी अर्जाची प्रक्रिया थंडावत आहे.
कर्जमाफी अर्ज प्रणालीला खोडा
विवीध शासकीय योजना मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात, शाळेत, बँकेत आधार कार्डाचा तगादा असतो. त्याचप्रमाणे शेतकर्यांच्या कर्जमाफी अर्जासाठी शेतकर्यांचे ऑनलाइन प्रक्रियेत बोटांचे ठसे जुळत नाहीत त्यामुळे त्यांना आपल्या फिंगर प्रिंट अपडेट करण्यासाठी आधार कार्डच्या शोधार्थ फिरावे लागतेय. या विलंबाने शेतकरीवर्गाच्या कर्जमाफी
अर्ज प्रणालीला खोडा बसत आहे. अशी माहिती चिंचघर इथले प्रयोशिल शेतकरी अशोक गोविंद पाटील यांनी यावेळी दिली. तर आधार कार्ड केंद्र लवकरच सुरू केली जातील असे वाडा तहसीलदार कार्यालयाकडून याबाबत सांगितले.