1 जुलैपासून सुरूवात
नवी दिल्ली : आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडी) 1 जुलैपासून बायोमॅट्रिक फिचर्समध्ये फेस ऑथेन्टिकेशनची सुविधाही उपलब्ध करणार आहे. ज्यांचे डोळे आणि बोटांचे ठसे घेण्यात अडचणी येतात अशांसाठी ही सुविधा आहे. हाताचे ठसे व्यवस्थित नसलेल्या व्यक्तींचे आता बायोमॅट्रिक व्हेरीफिकेशन होईल. यापूर्वी युआयडीने माहिती सुरक्षित राहावी यासाठी व्हर्च्युअल आयडीचा निर्णय घेतला आहे.
काहींसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार
युआयडीचे सीईओ आजय भूषण पांडे यांनी याबाबत सांगितले की, वयस्कर आणि ज्यांचे बोटांचे ठसे घेण्यात अडचणी येतात त्यांना फेस ऑथेंटिकेशन फिचरमुळे ओळख पटविणे सोपे होईल. 1 जुलै 2018 पासून ही सेवा सुरू केली जाणार आहे. आता आधार नोंदणीसाठी लोकांच्या चेहर्यांचे फोटोही घेतले जातील. आधारमध्ये नोंदणीसाठी सध्या लोकांचे डोळे आणि बोटांचे ठसे घेतले जातात. परंतु, अनेक लोकांना डोळ्यांचा त्रास असतो तसेच अनेकांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत, अशांसाठी हे फिचर उपयोगी ठरणार आहे.