पुणे । पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नवीन आधार कार्ड व आधारमध्ये माहिती अद्ययावत करण्यासाठी घेण्यात आलेल्या शिबिरात एकूण ५ हजार ८२० नागरिकांनी नवीन आधार नोंदणी आणि दुरुस्ती करण्यात आली. पुणे शहरात आधार नवीन नोंदणी आणि दुरुस्तीसाठी २ हजार ५८५ तर पिंपरी चिंचवड शहरात नवीन आधार नोंदणी व आधार दुरुस्तीसाठी ३ हजार २४५ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.
लोकांच्या मागणीनुसार दि. ८ आणि ९ सप्टेंबर रोजी पुणे शहरात तर ७ व १० सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात शिबिर घेण्यात आले.
पुणे शहरात २ हजार ५८५ पैकी १ हजार ८८ नागरिकांनी नवीन आधार कार्ड काढले तर १ हजार ४९७ नागरिकांच्या आधार कार्डांची दुरुस्ती करण्यात आली. तर पिंपरी-चिंचवड शहरातील ३ हजार २४५पैकी १ हजार२०२ नागरिकांनी नवीन आधार कार्ड काढले तसेच २ हजार ४३ नागरीकांनी आधार दुरुस्ती करून घेतली.
जनतेची मागणी विचारात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, युआयडी संचालक, तथा माहिती व तंत्रज्ञान विभाग, मुंबई व पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.