पुणे । शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, तसेच जिल्ह्यात मंडलस्तरावर आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सध्या 92 मशिन्स सुरू केल्या असून, येत्या आठवडाभरात 158 नवीन मशीन पुरविल्या जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक 160 मशीन ऑपरेटर देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून आधार (यूआयएडी) कडे पाठविण्यात आला आहे.
सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि मंडल कार्यालयांमध्ये
नवीन 158 मशीन पुरविले जाणार आहेत. त्यासाठी यूआयएडीची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर महाऑनलाइनकडून नवीन ऑपरेटरची नोंदणी करून त्यांच्या नावे लॉगिन केले जाईल, असे राव यांनी पुढे बोलताना सांगितले. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्यातील आधार केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ पुरवावे लागणार आहेत. दोन्ही शहरांमधील केंद्रांवर 195 मशीनची आवश्यकता आहे. तूर्तास 60 मशीनवर काम सुरू आहे. येत्या आठवडाभरात मशीन आणि नवीन ऑपरेटर पुरविले जातील, असेही त्यांनी सांगितले.
मनुष्यबळाचे आव्हान
केंद्र सरकारने 16 सप्टेंबर रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून आधार’ (यूआयएडी) आणि महाऑनलाइन यांच्या संयुक्त प्रयत्नानेच आधार नोंदणी केंद्रांची यंत्रणा राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मशीनची उपलब्धता झाली तरी ते चालविण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे आव्हान आहे.
– सौरभ राव, जिल्हाधिकारी