आधार कार्डसाठी विशेष शिबिर

0

पुणे । शहरामध्ये आधार कार्ड काढण्यासाठी व त्यातील माहिती अद्ययावत करण्याबाबतची जनतेची मागणी विचारात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय, युआयडी संचालक तथा माहिती व तंत्रज्ञान विभाग, मुंबई व पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने 8 व 9 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आधार कार्डची नोंदणी करणे व आधार कार्डातील माहिती अद्ययावत करण्याकरिता पुणे महापालिका क्षेत्रामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आहे.

पुणे महापालिका क्षेत्रामध्ये आधार शिबिर क्षेत्रीय कार्यालय येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय, पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृह घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, धनकवडी-सहकानगर क्षेत्रीय कार्यालय, वानवडी-रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय, कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगर पालिका येथील सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्येही शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे.