आधार कार्डही मोबाइल क्रमांकाशी जोडा

0

नवी दिल्ली । मोबाइल क्रमांकाशी आधार कार्ड संलग्न करणे गरजेचे आहे. आधार कार्ड संलग्न न केल्यास ग्राहकांचा मोबाईल क्रमांक बंद होण्याची शक्यता आहे. एक वर्षाच्या कालावधीत ग्राहकांचे मोबाइल क्रमांक आधार कार्डसह जोडण्यासंदर्भातील एक नोटीस दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना बजावली आहे.

दूरसंचार विभागाने पाठवलेल्या नोटीसनुसार, 6 फेब्रुवारी 2018 पूर्वी ही प्रकिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यानंतर ज्या ग्राहकांनी आधार कार्डची माहिती न दिल्यास त्या ग्राहकांची सेवा बंद करण्यात येईल. या प्रक्रियेत दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या आवश्यक कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्री पेड आणि पोस्ट पेड या दोन्ही ग्राहकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. ही पडताळणी ई-केवायसी प्रक्रियाने करण्यात येणार आहे.