आधार कार्ड केंद्रच झाले निराधार; नागरिकांची गैरसोय

0

कर्जत : कर्जत तालूक्यातील शेलू या गावात आधार कार्ड काढून देणारे सरकारतर्फे निय्ाुक्त केलेले एकमेव अधिकृत आधार कार्ड केंद्र आहे. हे केंद्र दररोज कार्यरत असणे गरजेचे असताना अनेकवेळा हे कार्यालय बंद असते. त्यामूळे नागरिकांची गैरसोय होत असून एकाच कामासाठी त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. बँकेत खाते उघडायचे असो का अन्य शासकीय कामकाज असो आधार कार्ड हे बंधनकारक केले आहे. त्यामूळे ज्या नागरिकांनी याप्ाूर्की आधारकार्ड काढलेले नाहीत ते आधार कार्ड काढण्यासाठी या केंद्रांच्या शोधात आहेत.

संबंधित व्यक्ती गैरहजर
कर्जत शहरातील ज्या आधार कार्ड केंद्रामध्ये आधार कार्ड काढून दिले जात होते ती सर्वकेंद्रे बंद झाली आहेत. तालूक्यातील नेरळ जवळील शेलू येथे एकच आधार कार्ड केंद्र सुरु असल्याची माहिती मिळते. अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने कर्जत मधील अनेक नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी शेलू येथील आधार कार्ड केंद्रात जातात. परंतु तेथेही संबंधित व्यक्ती गैरहजर असते. तर कधी केंद्रच बंद असते.त्यामूळे नागरिकांचा वेळ आणि पैसा यामध्ये खर्च होतो.

शासनाने आधार कार्ड बंधनकारक केल्याने नागरिकांची आधार कार्ड काढण्यासाठी धावाधाव होत आहे. कर्जतमध्ये आधार कार्ड केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी नागरिकांची समस्या लक्षात घेवून शासनाने कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय अथवा स्थानिक स्कराज्य संस्थाच्या कार्यालयात आधार कार्ड केंद्र सुरु करावे .
अॅड दिपक बोटुंगले कर्जत,