आधार प्रतिष्ठानचा सहज विजय

0

मुंबई । प्रिया तिवारी आणि मलाईका चौहान यांनी केलेल्या प्रत्युेकी एक गोलामुळे आधार प्रतिष्ठानने विफा महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत नागपुरच्या तिरपुडे अकादमीवर 2-0 असा विजय मिळवला. विजयी संघाचे दोन्ही गोल सामन्याच्या उत्तरार्धात नोंदवले गेले. पहिल्या सत्रातील गोलशुन्यची कोंडी फोडताना प्रियाने 43 व्या मिनिटाला संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इंज्युरी टायमिंगमध्ये मलाईकाने गोल करत संघाला विजयाचे पूर्ण गुण मिळवून दिले. अन्य लढतीत एफ सी पुणे सिटी संघाने कोल्हापुरच्या केएसए वुमन्स फुटबॉल क्लबचा 1-0 असा पराभव केला. या सामन्यात मुरीएल अ‍ॅडमचा गोल निर्णायक ठरला.