अहमदाबाद । गुजरात विद्यापीठामधील एका शिक्षिकेने एका विद्यार्थिनीवर गर्भपात करण्यासाठी दबाब आणल्याची घटना उघड झाली आहे. वैशाली आचार्य नावाच्या या शिक्षिकेच्या विरोधात संबंधीत विद्यार्थीनीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वैशाली आचार्यवर विद्यार्थ्यांचं शोषण करण्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांकडून सिनेमांची तिकीटे किंवा डब्बा मागवणे हे वैशाली आचार्य यांचे रोजचेच काम होते. पण एक दिवस त्यांनी गर्भवती विद्यार्थिनीला थेट गर्भपात करण्याचा दबाव आणण्यास सुरूवात केली. या विद्यार्थिनीला आधी गर्भपात कर मगच कॉलेजला ये, असे वैशाली आचार्य यांनी बजावले होते. अखेर विद्यार्थिनीने पोलीस तक्रार केल्यानंतर विद्यापिठाच्या प्रशासनाला जाग आली. पोलीस तक्रारीनंतर कुलगुरुंनी वैशाली आचार्यवर निलंबनाची कारावाई केली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली आहे.