नवापूर । नगरपालिका निवडणुकीतील नवापूर विकास आघाडीचे वार्ड क्र 5 ब मधुन उमेदवारी करणारे रामकृष्ण प्रकाश गिरासे यांचे गुरूवार 23 नोव्हेबरी रोजी लग्न होते. ते कालच उमेदवारी अर्ज दाखल करुन नंतर लग्नासाठी आनंद ता. जि. आनंद (गुजरात) येथे घाई घाईने रवाना झाले आहेत. आधी लग्न निवडणुकीचे मग माझे असे चित्र पाहायला मिळाले. रामकृष्ण गिरासे हे पहिल्यांदाच नगरपालिका निवडणुक लढवत असून याच महिन्यात त्यांचे लग्न ठरले. आधीच निवडणुक छायी त्यातच लगीन घाई असा प्रसंग पाहायला मिळाला.
कार्यकर्त्यांकडून लग्नाच्या शुभेच्छा स्नेह भोजन,पाहुणे,लग्नाची तयारी गर्दी व निवडणुक फार्म सादर करणे यात नवरदेवाची धावपळ उडाली. हळदीचे अंग असलेला नवरदेव रामकृष्ण गिरासे यांनी नवीन पक्ष झालेला नवापूर विकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. आघाडीतर्फे नवरदेवाने निवडणुकीत सक्रीय सहभाग घेतला असून एक सामाजीक कार्यकर्त व सुशिक्षित तरुण व्यापारी अशी त्यांची ओळख आहे. यावेळी विकास आघाडीचे पदाधिकारी व नागरीक,मित्र यांनी तहसील कार्यालयाबाहेर येऊन रामकृष्ण यास लग्नाचा शुभेच्छा दिल्या. निवडणुकीतील उमेदवार रामकृष्ण गिरासे या नवरदेवाची निवडणुक व लगीनघाई एकसाथ पाहायला मिळाली.