आधी मैत्री नंतर जळगावात विवाहितेवर बलात्कार करीत मागितली खंडणी

जळगाव : सोशल मिडीयाच्या प्लॅटफार्मवरून विवाहितेशी आधी मैत्री करून नंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला व त्याचा व्हिडिओ काढून विवाहितेसह तिच्या पतीकडे 50 हजारांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी गणेश प्रकाश चौधरी (48, रा.जळगाव) विरोधात रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अत्याचार करून व्हिडिओही बनवला
शहरातील एका भागात 33 वर्षीय विवाहिता ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते व पीडीतेचे इन्ट्राग्रामच्या माध्यमातून संशयीत आरोपी गणेश चौधरीशी ओळख झाली. मैत्रीच्या आड फेशीयल करण्याच्या बहाण्याने विवाहितेला आरोपीने शहरातील एका हॉटेलमध्ये बोलावले व तेथेच विवाहितेवर अत्याचार करण्यात आला व आरोपीने कृत्याचा व्हिडिओही बनवला त्यानंतर आरोपीने विवाहितेकडे 50 हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ पतीला दाखवण्याची धमकीही देण्यात आली तर विवाहितेने नकार देत समजावण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने मारहाण केली. यानंतर आरोपीने पीडीतेसह तिच्या पतीकडूनही फेसबुकवरून पैशांची मागणी केली. त्रास असह्य झाल्याने शेवटी विवाहितेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात आरोपी गणेश चौधरीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहा.निरीक्षक शांताराम पाटील करीत आहेत.