पुणेः राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संयुक्त सरकार येऊ दे, मग बोलू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार कोल्हे शिवसेना पक्षात होते. त्यानंतर त्यांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कोल्हे यांची अफाट लोकप्रियता लक्षात घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांना राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून कोल्हे निवडून आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारासाठी कोल्हे यांनी यात्रा काढली. या यात्रेदरम्यान कोल्हे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रचार यात्रेवर टीका केली होती.
हे देखील वाचा