आधुनिकतेची कास धरीत बँकेची प्रगतीशिल वाटचालीचा निर्धार

0

जळगाव । जुलै महिना इंटरनॅशनल इयर ऑफ कॉ-ऑपरेटिव्ह म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. कॉ-ऑपरेटिव्ह इनशुअर नो वन इज लेफ्ट बिहाइन्ड यावरुन को-ऑपरेटीव्ह क्षेत्राचा सर्वांना समावेश करुन घेण्याचा उद्देश आहे. या संकल्पनेनुसार जळगाव पीपल्स को-ऑप. बँक बचतगटाच्या माध्यमातून कामांना सुरुवात केल्याचे चेअरमन भालचंद्र पाटील यांनी पीपल्स को-ऑप. बँकेची 83 वी वार्षिक सभेत सांगितले. व्हा.चेअरमन डॉ.प्रकाश कोठारी, डॉ.सी.बी.चौधरी, दादा नेवे, सुरेखा चौधरी, स्मिता पाटील, प्रा.विलास बोरोले, सुनिल पाटील, रामेश्‍वर जाखेटे, चंदन अत्तरदे, डॉ.सुहास महाजन, अनिकेत पाटील, राजेश परमार, जे.एम.अग्रवाल,अनिल पाटकर, दिलीप देशमुख आदी उपस्थित होते.

उत्तम ग्राहकसेवा
केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्र ढवळून निघाले असल्याचे चेअरमन भालचंद्र पाटील यांनी सांगितले. या कठिण परिस्थितीचे बँकेच्या कर्मचार्‍यांनी अतिशय चांगले नियोजन करुन उत्तम ग्राहकसेवा दिली व पर्यायाने आपल्या राष्ट्रीय स्तरावरील निर्णयाच्या अंमलबजावणीत भरघोस योगदान दिले असल्याचे सांगितले. या कालावधीत बँकिंग क्षेत्रातील तरलतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. सर्वसामान्य लोकांनी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाते उघडलेत व कासा ठेवी वाढण्यास मदत झाली असल्याचे सांगितले.

10 बिल्डर्संनी उघडले खाते
वस्तू व सेवाकर कायदा (जेसटी) 1 जुलै पासून लागू झालेला आहे. बँकिंग सर्व्हिसेसवर 15% सर्व्हिस टॅक्स लागू होता. आता जीएसटीमुळे हा दर 18% झाला आहे. यामुळे बँकेचे सर्व्हिस चार्जेसमध्येही वाढ होई असे भालचंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. रेराधोरणानुसार बिल्डरला शेड्युल बँकेत खाते उघडून प्रोजेक्टचे पैसे बांधकाम खर्चासाठी वेगळे ठेवायचे आहेत. सर्वांना राहण्यासाठी घर या धोरणानुसार रिझर्व बँकेने घराच्या कर्जाच्या रिक्स वेटमध्ये कपात केलेली आहे. बँकेने या कायद्याखाली 10 बिल्डर्सची खाती उघडली असल्याची माहिती दिली.

कॅशलेस व्यवहारासाठी पुढाकार
बँकेच्या विविध सेवासुविधांची माहिती देण्यात आली. वय वर्षे 10 वरील विद्यार्थ्यांना स्वत: आपल्या बँकेत बचतखाते उघडता येते आणि बँकेच्या सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच ग्राहकाने नवीन खाते उघडल्यास त्याला त्वरीत व्यवहारासाठी इन्स्टा एटीएम कम डेबिट कार्ड उपलब्ध करुन देण्यात येते. कॅशलेस व्यवहारासाठी बँकेने मोबाईल बँकिग सुविधा, पिओएस स्वाईप मशिन सुविधा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सूत्रसंचालन डॅा.सी.बी.चौधरी यांनी जर आभार सुनिल पाटील यांनी केले.