खालापूर । शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शौर्य किर्ती आणि कर्तबगारीने छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांच्या मनात अखंड अधिराज्य गाजवत असून महाराजांच्या विचाराचे आणि त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची भुरळ तरुणाईला पडत असल्याने अनेक तरुण डोक्यामध्ये, शरीरावर शिवाजी महाराजांचे चित्र, आभुषणे परिधान करीत राजमुद्रा, शिवमुद्रा यांच्या टॅट्यू कोरत शिवचरित्राला उजाळा देत आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षानंतरही तरुणाईचे आकर्षण ठरत आहे. महाराजांसारखे केस दाढी, आभुषणे परिधान करत असुन या सगळ्यातून सांस्कृतिक वातावरण निर्माण होत आहे. तसेच मराठी अस्मिता देखील जागी होत असल्याने अनेक तरुणाच्या हात, मनगट, मान , खांदा आणि दंडावर अशा अनेक प्रकारचे ट्यटू कोरताना दिसत असल्याने काही जणांनी तर क्षत्रिय कुलवंत, श्रीमंत योगी, जाणता राजा, जय शिवराय व राजे अशी वेगवेगळ्या प्रकारची नावे कोरत आहेत. तर, काही तरुणांनी राजमुद्रा, शिवमुद्रा व वाघ कोरून घेत आहेत.
इतकेच नव्हे महाराजांसारखा चंद्रकोर टिळा लावणे कानात डुल , मनगटात कडे आणि गळ्यात मोत्याची माल अशी आभुषणे घालणे तसेच महाराजाप्रमाणे दाढी व केस देखील आजची तरुणाई ठेवून आपल्या आराध्यदैवताला स्मरण करीत आहेत. महाविद्यालय व नोकरदार तरुणामध्येही अशा पध्दतीचे ट्यटू आणि रंगभूषा करण्याची आवड असल्याचे दिसत आहे.