आधुनिक युगात प्रत्येकाने शिक्षणावर भर देण्याची गरज

0

नंदुरबार। समाजात शिक्षणाला खूपच महत्त्व आहे. आजच्या आधुनिक युगात शिकेल तोच टिकेल, त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणावर भर दिला पाहीजे असे प्रतिपादन उमेश करोडपती यांनी केले. ते येथील बडगुजर समाजातर्फे घेण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी 87 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार व अ.भा.बडगुजर समाज युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक वाचनालय सभागृहात बडगुजर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, समाजातील पदोन्नती, निवृत्त तसेच विशेष प्राविण्यप्राप्त समाज बांधवांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

सुत्रसंचालन मंडळाचे सचिव विजय संतोष बडगुजर यांनी तर आभार पंडीतराव बडगुजर यांनी मानले. यशस्वीतेसाठी भाईदास दगा बडगुजर, रविंद्र काशिनाथ बडगुजर, देविदास भगवान बडगुजर, संदीप लक्ष्मण बडगुजर, दिनेश शामराव बडगुजर, अश्‍विन भालचंद्र बडगुजर, विलास अशोक बडगुजर, विजय जगन्नाथ बडगुजर, प्रकाश नागो बडगुजर आदींनी सहकार्य केले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.बडगुजर समाज महासमितीचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेशजी करोडपती, उपाध्यक्ष, भगवानशेठ बडगुजर, महासचिव राजेंद्र बडगुजर, नंदुरबार तालुका पोलीस स्टेशचे निरीक्षक विठ्ठल मोहकर, सा.बां.उपविभाग नंदुरबाचे उपअभियंता नानासाहेब चव्हाण, शिंदखेडा तालुका बडगुजर समाज मंडळाचे उपाध्यक्ष संतोष रावजी बडगुजर नंदुरबार पंचायत समितीचे उपअभियंता प्रमोद बडगुजर, पत्रकार ईश्‍वर बडगुजर, संतोष चिंधा बडगुजर, पी.डी.बडगुजर, संजय जगन्नाथ बडगुजर, शिक्षक रविंद्र मोहन बडगुजर आदी उपस्थित होते.